Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क
श्री. शिवाजीराव मोघे श्री. सचिन अहिर श्री. आर. डी. शिंदे

हेल्पलाईन टोल फ्री नंबर - १८००-२३३-११५५

चालु घडामोडी

अठ्ठ्याऐंशी दांपत्यांनी जातीला चारली 'माती'
सकाळ
२५ एप्रिल २०१३

मुला-मुलींचा विवाह करायचा असला तर पहिल्यांदा जात अन्‌ नोकरी पाहिली जाते. मग, त्याच्या स्थावर, जंगम मालमत्तेचीही तपासणी होते. त्यामुळेच अनेक प्रेमवीर विवाहावेळी "जाती'साठी "माती' खातात. परंतु, गेल्या वर्षी जिल्ह्यातील 88 जोडपी "जाती'ला "माती' चारून विवाहबद्ध झाले आहेत. याची दखल घेऊन त्यांना 42 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान समाजकल्याण विभागाने दिले आहे.

 
जातीचा दाखला आता मूळ गावातून
लोकमत
०४ मार्च २०१३
– राज्यात कुठेही दाखला मिळण्याची सुविधा रद्द, रहिवासाची तारीख ठरणार आधार

जातीचे प्रमाणपत्र आता कोणत्याही उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मिळण्यास ब्रेक लागला आहे. यापुढे सर्वच जाती, जमातींसाठी ठरवून देण्यात आलेल्या मानीव दिनांकाला अर्जदार किंवा त्याचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत असतील, त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातूनच जात प्रमाणपत्र मिळणार आहे. ‘जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम २0१२’ नुसार ही कार्यपध्दती सुरू झाली आहे. अधिकारी–कर्मचार्‍यांना याबाबतचे प्रशिक्षण गुरुवारी अमरावती येथे देण्यात आले.

 
जॉब फेअरद्वारे समाजातील दुबळ्या घटकांना संधी
लोकमत
२८ डिसेंबर २०१२
सोलापूर, भारत.

समाज कल्याण आयुक्तालयाच्या माध्यमातून समाजातील सर्व प्रवर्गातील घटकांना स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून 'जॉब फेअर'च्या माध्यमातून शासकीय क्षेत्राप्रमाणेच खासगी, औद्योगिक क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे समाज कल्याण आयुक्त बाजीराव जाधव यांनी सांगितले.

 
कागदी अपंगांना बसणार लगाम : बाजीराव जाधव
सकाळ
२८ डिसेंबर २०१२
सोलापूर , भारत.

शरीराने धडधाकट असलेल्या; परंतु बनावट अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर अपंगांचे लाभ घेणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. राज्याच्या अपंगकल्याण विभागाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी खास "सदारेम' नावाचे सॉफ्टवेअर तयार केल्याची माहिती राज्याचे अपंग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव यांनी दिली.

 
अधिक वाचा...

हे संकेतस्थळ जनसेवार्थ सादर करीत आहोत!

केंद्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर संकेतस्थळ दि. २०-०८-२०११ पासून पुनःरचित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील माहिती वापरासाठी व उपयुक्ततेसाठी वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम या अंतर-राष्ट्रीय संस्थेच्या AA स्तराच्या निर्देशांचे अवलंबन करण्यात आले आहे.


मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम