| व्यसनमुक्ती जागृतीसाठी साहित्य संमेलनाचा फंडा! |
|
|
|
सकाळ ०३ मे २०१२,नागपूर, भारत - रमाकांत दाणी व्यसनमुक्तीबद्दल समाजात व्यापक जागृती व्हावी, या विषयावर मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती व्हावी, या उद्देशाने व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाची कल्पना सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मांडली आहे. पुणे आणि नागपुरात ही संमेलने आयोजित होणार असून, याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडून तयार होत आहे. व्यसनमुक्ती हा मोघेंचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यसनमुक्तीबद्दलच्या जागृतीसाठी त्यांनी यापूर्वी बरेच कामही केले आहे. योगायोगाने त्यांच्याकडे या विषयाचे खातेही आहे. व्यसनमुक्तीच्या जाणीव जागृतीसाठी त्यांच्या स्वतःच्या काही कल्पना आहेत. व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाची कल्पनाही त्यांची मांडली आहे. येत्या दोन महिन्यांत पुणे आणि नागपुरात अशी संमेलने आयोजित करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. अशा संमेलनाच्या आयोजनामागील कल्पना स्पष्ट करताना मोघे म्हणाले, 'दुर्दैवाने व्यसनमुक्तीच्या विषयावर दर्जेदार साहित्यच उपलब्ध नाही. व्यसनमुक्तीचा विषय काढला की, राम गणेश गडकरी यांचे "एकच प्याला' नाटक तेवढे आठवते. त्यानंतर या महत्त्वाच्या विषयावर लिखाणाची गरज कोणालाही भासली नाही. त्यामुळेच साहित्य संमेलनाचा खटाटोप सुरू आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या महत्त्वाच्या विषयाला वाचा फुटावी, हा हेतू आहे. संमेलनाच्या निमित्ताने लेखक मंडळी एकत्र येतील. व्यसनमुक्तीच्या विषयावर चर्चा झडू शकेल.' सामाजिक न्याय विभागाने काही महिन्यापूर्वी व्यसनमुक्तीचे नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणात व्यसनमुक्तीसाठी राज्यात व्यापक मोहीम हाती घेण्याचे उद्दिष्ट्य ठेवले गेले आहे. या विषयावर दर्जेदार लिखाण करणाऱ्या लेखकांना पुरस्कार प्रदान करण्याची आमची योजना आहे. त्यात व्यसनमुक्तीच्या कथा, नाटकांचा समावेश असेल. "तंटामुक्ती'च्या धर्तीवर प्रसार माध्यमांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. व्यसनमुक्ती ब्रॅंड ऍम्बेसेडर! मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांमध्ये व्यसनांचे प्रमाणही चिंताजनक ठरते आहे. त्यामुळे माध्यमिक शालेय अभ्यासक्रमांमध्ये व्यसनमुक्तीचे धडे समाविष्ट करण्याचे प्रयत्न आगामी सत्रापासून होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Bookmark
Email this
Hits: 726 Comments (0)
![]() |






जाहिरात: महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला व पुनर्वसन केंद्र









