Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

मागास प्रवर्ग युवक/ युवतींना मोटार वाहन चालक/ वाहक प्रशिक्षणासाठी पाठविणे. Print E-mail
शासन निर्णय क्र:-
  • विजाभ-२००८/ प्र.क्र.२१३/मावक-३,दिनांक२३जुलै, २००९
  • विजाभ-२००८/प्र.क्र.२१३/मावक-३,दिनांक ३० जुलै,२००९

    योजनेचा उद्देश्य

    बेरोजगारांना स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक भाग म्हणून राज्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द तसेच अनुसूचित जमातीच्या तरूण/ तरूणींना वाहन चालक वाहन प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासन निर्णय दि ४.२.२००८ नुसार घेण्यात आलेला आहे. त्या धर्तीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या तरूण/ तरूणींना सदरची योजना वरील शासन निर्णयानुसार सन २००९-१० पासून लागू करण्यात आलेली आहे.

    योजनेचा अटी:

    १) लाभार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील असावा.

    २) हलके वाहन चालक प्रशिक्षणासाठी लाभार्थाचे शैक्षणिक पात्रता किमान इ ८ वी पास असावी.

    ३) अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान इ ८ वी पास असावी.

    ४) वाहक (कंडक्टर) प्रशिक्षणासाठी लाभार्थाचे शैक्षणिक पात्रता किमान इ १० वी पास असावी.

    लाभार्थीचे लाभाचे स्वरूप

    अ. क्र प्रशिक्षणाचा प्रकार प्रशिक्षण कालावधी मंजूर दर
    हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षण ४० दिवस रु.३५२०/-
    अवजड मोटार वाहन चालक प्रशिक्षण ४० दिवस रु.४१००/-
    वाहक (कंडक्टर) प्रशिक्षण ८ दिवस रु.१६४५/-

    प्रशिक्षण कालावधी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्याल्याचा ठिकाणी राहणारे स्थानिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संस्थेचा वसतिगृहात राहत नसल्यास मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थी रु.३००/- वाहक प्रशिक्षणार्थीस रु.१५०/- प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाते.

    सदरची योजना राज्यामध्ये मे. रमेश मोटार ड्राईव्हिंग स्कूल जळगांव यांचेमार्फत राबविली जाते.

    संपर्क:- विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी (संबंधित जिल्हा)

    Comments (0)Add Comment
    Write comment
     
     
    smaller | bigger
     

    security image
    Write the displayed characters


    busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम