Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

अपंग व्यक्तींचे मानवाधिकार त्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण कृती आराखडा- २०११ Print E-mail
अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्चरोड, पुणे-१
प्रस्तावना
१.१ अपंगत्वाची व्याख्या:

'अपंगत्व' व 'अपंग व्यक्ती' अथवा अनोख्या समर्थ व्यक्ती (Differently Abled Persons) म्हणजे अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग ) अधिनियम, १९९५ मध्ये नमूद केलेल्या व्याख्येप्रमाणे आणि अपंग व्यक्तीच्या कल्याणार्थ जो कयदा अंमलात आणला जाईल त्याप्रमाणे रहील.

१.२ अपंग व्यक्तींची लोक्संख्या :
क्र. अपंगत्वाचा प्रकार अपंग व्यक्तींची संख्या
    पुरुष स्त्रिया एकूण
अंध ३२०४६६ २६०४६४ ५८०९३०
मुके ६३८०२ ४९२४१ ११३०४३
बहिरे ५१७८९ ४०६०१ ९२३९०
अस्थिव्यंग ३७४६७१ १९५२७४ ५६९९४५
मतिमंद १२३१३९ ९०१३५ २१३२७४
एकूण ९,३३,८६७ ६,३५,७१५ १५,६९,५८२
महराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या १.०६ टक्के एवढी अपंग व्यक्तींची लोकसंख्या आहे.
१.३ दृष्टीक्षेप:
अपंग व्यक्तींमधील व्यंग न पहाता, 'अनोखे सामर्थ्य  असलेले व्यक्तिमत्व' असे संबोधून त्यांच्यामध्ये असलेले सामर्थ्य  व क्षमता ओळखून त्या विकसित करण्यासाठी अपंगत्वाचे लवकर निदान, त्वरित हस्तक्षेप, व्यवसायिक प्रशिक्षण नोकरी इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांना संधी देवून, आणि कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यामध्ये जिद्द, आत्मविश्वास निर्माण होऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामान्य व्यक्तींसारखे सन्मानपूर्वक जीवन व्यथीत करतात ही बाब लक्षात घेवून शासनाने पुढील दृष्टीकोन (व्हीजन) ठेवला आहे.

प्रतिष्ठा आणि सन्मान अनोख्या समर्थ व्यक्तींसाठी ...त्यांचे सामर्थ्य, कौशल्य आणि जीवनाकडे पहाण्याचा आश्वासक दृष्टीकोन यांना दाद देत ... त्यांच्या सुप्त सामर्थ्यांचा वापर करुन घेत, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी...

A Life of Dignity and Respect for Differently Abled Perosns To optimise their ability, skill and to enhance their parivipation in the min-stream of the society by utilising that under-tapped asset.


१.४ अस्तित्वात असलेले कायदे व यंत्रणा:
अपंग व्यक्तींकरीता खालीलप्रमाणे कायदे व यंत्रणा कार्यरत आहेत.
(एक) अपंग व्यक्ती (समाना संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५.
(दोन) महाराष्ट्र राज्य अपंग (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) नियम २००१.
(तीन) आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात, बहुविकलांग व मतिमंद व्यक्तीकरीता राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९.
(चार) युनायटेड नेशन्स कन्व्हेंशन फॉर दि राइट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज २००६.
(पाच) अपंग व्यक्ती अधिनियमन १९९५ च्या कायद्यातील तरतूदीप्रमाणे गठीत करण्यात आलेली राज्य समन्वय समिती.
(सहा) अपंग व्यक्ती अधिनियमन १९९५ च्या कायद्यातील तरतूदीप्रमाणे गठीत करण्यात आलेली राज्य कार्यकारी समिती.
(सात) आयुक्त, अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे.
(आठ) महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळ, मुंबई.
(नऊ) जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अपंग व्यक्ती अधिनियमन १९९५ च्या कायद्यातील तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली जिल्हास्तरीय समिती.
(दहा) अपंग व्यक्ती अधिनियमन १९९५ च्या कायद्यातील तरतूदीप्रमाणे अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेले वैद्यकीय मंडळ (Medical Board).
(अकरा) राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ मधील तरतूदीप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली स्थानिकस्तर समिती.
अधिक वाचा...
Comments (1)Add Comment
0
A.B.Inamdar
December 22, 2011
110.226.110.97
Votes: +2
Insufficiant Informations

There is't sufficiant information about schemes. Many many G.R's not uploaded on this site. It will be helpful if maximum depatrmentat's G.R.tobe uploaded on this website.

Write comment
 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters


busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम