|
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना |
|
|
|
शासन निर्णय:
शासन निर्णय क्रमांक: विसयो-२०१०/प्र.क्र.१७५/विसयो-२/दिनांक २६ ऑक्टोबर २०१०
केंद्र शासनाने विहित केलेले निकष
उद्देश:
केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार राज्यातील ४० ते ६५ वर्षांखालील विधवा स्त्रियांना मासिक निवृत्ती वेतन देणे.
पात्रतेचे निकष, अटी व शर्ती:
- वय- ४० ते ६५ वर्षांखालील विधवा
- कुटुंबाचे नाव ग्रामीण/ शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समाविष्ट असावे.
लाभाचे स्वरूप:
- लाभार्त्यांस या योजनेतून रु.२००/- + रु.४००/- संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून असे एकूण रु.६००/- निवृत्तीवेतन दरमहा देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे:
- वयाचा दाखला
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
संपर्क:
अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार.
 |