| ई-स्कॉलरशिप योजनेस मुदतवाढ |
|
|
|
महाराष्ट्र टाइम्स, २१ मार्च २०१२ आता २७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'ई-स्कॉलरशिप' योजनेस मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाजकल्याण खात्याने घेतला आहे. यामुळे २७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहेत. मागासवगीर्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये यासाठी राज्य सरकारने ई-स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे स्कॉलरशिपची रक्कम थेट संबधित विद्यार्थ्याच्या खात्यात, तर शिक्षण फी, परीक्षा फी आणि कॉलेजची इतर फी संबधित कॉलेजच्या खात्यात जमा होते. दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या आणि ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरणाऱ्या मागासवगीर्य विद्यार्थ्यांनाच या स्कॉलरशिपचा फायदा मिळणार आहे. ई-स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे हे फॉर्म भरण्याचे राहून गेल्याने कॉलेज आणि विविध संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. समाजकल्याण खात्याने दिलेल्या मुदतवाढीमुळे १५ ते २७ मार्च दरम्यान हे ऑनलाइन फॉर्म विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. हे फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक आणि उत्तीर्ण झाल्याची माहिती सोबत ठेवणे गरजेचे आहे. वाढीव मुदतीत अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, शिक्षण फी, परीक्षा फी ही एप्रिल किंवा मे महिन्यानंतर मिळेल, असे समाजकल्याण विभागाचे आयुक्त आर. के. गायकवाड यांनी सांगितले.
Bookmark
Email this
Hits: 1251 Comments (3)
![]() |







जाहिरात: महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला व पुनर्वसन केंद्र









